गोव्यात उपनिरीक्षक बदलीचा वाद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

पंचनामा करताना एकावर लाथ मारल्याने सांगे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाल्यावर त्या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. 

पणजी : पंचनामा करताना एकावर लाथ मारल्याने सांगे पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक सुदिन रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाल्यावर त्या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. 

रेडकर एका मृतदेहाचा पंचनामा करताना एका व्यक्तीस लाथाडत असल्याची चित्रफीत व्हॉट्सअपच्या माध्यमातून सार्वत्रिक झाल्यानंतर रेडकर यांची राज्य राखीव पोलिस दलात बदली झाली आहे. त्यांची चौकशीही सुरु झाली आहे. मात्र, रेडकर यांना तसे करण्यास त्या व्यक्तीने भाग पाडले, अशी माहिती देणारी दुसरी ध्वनीचित्रफित आज व्हॉट्सअपवर फिरू लागली आहे. त्या व्यक्तीने आपण त्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी असल्याचा दावा केला आहे.

Web Title: Goa Police Sub Inspector Transfer Clashes

टॅग्स