ललित गोगई पुन्हा वादाच्या भोवऱ्यात 

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 मे 2018

जम्मू आणि काश्‍मीरमधील एका स्थानिक युवकाला जीपला बांधून त्याचा ढाल म्हणून वापर करणारे भारतीय लष्करातील मेजर जनरल ललित गोगई पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. येथील एका हॉटेलमध्ये गोगई हे एका महिलेबरोबर आक्षेपार्हस्थितीत आढळून आले असल्याचा दावा काही स्थानिक पत्रकारांनी केला आहे.
 

श्रीनगर -  जम्मू आणि काश्‍मीरमधील एका स्थानिक युवकाला जीपला बांधून त्याचा ढाल म्हणून वापर करणारे भारतीय लष्करातील मेजर जनरल ललित गोगई पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. येथील एका हॉटेलमध्ये गोगई हे एका महिलेबरोबर आक्षेपार्हस्थितीत आढळून आले असल्याचा दावा काही स्थानिक पत्रकारांनी केला आहे.

गोगई आणि इतर काही जवानांना हॉटेलमधून पोलिसांनी आज ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशी केल्यानंतर त्यांना पुन्हा लष्कराच्या हवाली करण्यात आले. संबंधित महिलेचा जबाबही नोंदविण्यात आला आहे. स्थानिक युवकाला जीपला बांधून ठेवण्याचा गोगई यांचा निर्णय वादग्रस्त ठरला होता.

Web Title: Gogoi is again in problem