सीमाशुल्क विभागाकडून 2 कोटींचे सोने गायब

Gold
Gold

नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या सीमाशुल्क विभागाच्या तिजोरीतून दोन हजार कोटी रुपये किमतीचे साडेआठ किलो सोने गायब झाल्याबाबत केंद्रीय अन्वेषणने तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीमध्ये अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हेगारी कट आणि गुन्हेगारी स्वरूपातील विश्‍वासभंग या कलमांखाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.


साडेआठ किलो सोन्याच्या जागी बनावट सोने ठेवल्याचे आढळून आले. सुरवातील या प्रकरणाची चौकशी दिल्ली पोलिसांकडे होती. मात्र त्यानंतर केंद्रीय अर्थ मंत्रालयाने याप्रकरणी सीबीआयकडे तपास सोपविला. याचसोबत केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा दक्षता विभागही सीमाशुल्क विभागाच्या संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिल्ली सीमाशुल्क विभागाकडून 6 कोटी रुपये किमतीचे 23 किलोचे सोने गायब झाल्याची माहिती "माहिती अधिकारा'तून समोर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com