लंकेश हत्या प्रकरणः दादा-मुरळीच्या शोधार्थ एसआयटी

लंकेश हत्या प्रकरणः दादा-मुरळीच्या शोधार्थ एसआयटी

बंगळूर - गौरी लंकेश हत्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने निहाल ऊर्फ दादा व मुरळी ऊर्फ शिवा यांना अटक करण्याचा प्रयत्न चालविला आहे. चारही विचारवंतांची हत्या व विविध बाँबस्फोट प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अमोल काळे याच्या डायरीत असलेला मेकॅनिक कोडवर्डच्या आधारे महाराष्ट्राच्या पोलिसांनी वासुदेव सुर्यवंशी उर्फ मेकॅनिकला अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे पोलिसांना हत्या केलेल्या संघटनेचे नाव शोधून काढण्यास सोपे जाणार आहे. सर्व विचारवंतांच्या हत्येमागे मुरळी असल्याचे महाराष्ट्र एटीएस आपल्या चौकशी अहवालात म्हटले आहे.

वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर, श्रीकांत पांगारकर व अविनाश पवार हे बेकायदा शस्त्रास्त्र प्रकरणात असून त्यात मुरळीचे महत्वाचे पात्र असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. मुरळीनेच सर्वांची नेमणूक करून हत्येसाठी प्रवृत्त केले. बेळगाव, औरंगाबाद, मुंबई व जालना येथे बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण दिले, याची माहिती स्पष्ट होत आहे. काळेला अटक झाल्यानंतर नेमणुकीचे काम मुरळीने स्थगित केले होते, अशी माहिती एसआयटी अधिकाऱ्यांनी दिली.

वासुदेव सूर्यवंशी याच्या दुचाकीची चोरी झाली होती. गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांना त्याने दुचाकी दिल्याचा संशय आहे. अलिकडेच महाराष्ट्र पोलिसांनी दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित शरद कळसकर याच्याकडून बजाज पल्सर दुचाकी ताब्यात घेतली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणात मिस्कीन व परशुराम वाघमारे याने ही दुचाकी वापरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com