149 नवे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार: स्वराज

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

स्वराज यांनी देशात 149 ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उघडणार असल्याची यावेळी घोषणा केली. टप्प्या टप्प्यांमध्ये काही केंद्रे सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 86 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 52 कार्यान्वित होणार आहे.

नवी दिल्ली - आता कोणत्याच भारतीयाला पासपोर्ट मिळवण्यासाठी 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागणार नाही. केंद्र सरकार संपूर्ण देशभरात पासपोर्ट सेवा केंद्रे (पीएसके) उभारणार आहे. यासाठी देशातील प्रमुख 650 टपाल कार्यालयांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता देशातील प्रमुख टपाल कार्यालये देखील पासपोर्टची सेवा देऊ शकणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी दिली.

स्वराज यांनी देशात 149 ठिकाणी पासपोर्ट सेवा केंद्र उघडणार असल्याची यावेळी घोषणा केली. टप्प्या टप्प्यांमध्ये काही केंद्रे सुरू केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 86 केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात 52 कार्यान्वित होणार आहे.

टपाल कार्यालयातील या केंद्रांव्यतिरिक्त सरकारने यापूर्वी 16 पासपोर्ट सेवा केंद्रे उभारली आहेत, असे त्या म्हणाल्या. "जेव्हा मी मंत्रालयाचे कामकाज हाती घेतले, त्यावेळी आमच्याकडे संपूर्ण देशभरातून केवळ 77 पासपोर्ट सेवा केंद्र होते आणि त्यामुळे बर्‍याच लोकांना पासपोर्ट मिळवण्याकरिता तीनशे ते चारशे किलोमीटर लांब जावे लागते. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. या पार्श्वभूमीवर पासपोर्ट काढणे सहज शक्य व्हावे, यासाठी प्रत्येक आणखी नवी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय परराष्ट्र मंत्रालयाने घेतला आहे,'' असेही त्या म्हणाल्या.

आमच्या मंत्रालयाने पासपोर्ट मिळवण्यासाठी कोणत्याही नागरिकला 50 किलोमीटरपेक्षा जास्त लांब जावे लागू नये असे निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे आम्ही लक्ष्य निर्धारित केले असून त्यानुसार नियोजन देखील केले आहे.

परदेशातील भारतीय युवकांना भारतीय संस्कृतीशी जोडण्यासाठी सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत एक "नो इंडिया प्रोग्रॅम" नावाने वेब पोर्टल सुरू केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शेवगावात एकाच कुटुंबातील चौघांची गळा चिरून हत्या
जमिनीच्या तुकड्यासाठी शेतकऱ्याचा सायकलवरून 350 किमीचा प्रवास
अविवाहीत मुलीच्या आत्महत्येवरुन चांदुर रेल्वे शहरात तणाव​
कन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार​
कुबट कोपऱ्याचं भान...
दार्जिलिंगचा वणवा (श्रीराम पवार)​
कर्जमाफी, निकष आणि भोग​
#स्पर्धापरीक्षा - फेसबुकचे सोलार ड्रोन​