देशविरोधी कारवायांमुळे 12 कर्मचारी बडतर्फ

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

श्रीनगर - देशविरोधी कारवायांबद्दल गुन्हा दाखल असलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील 12 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अहवाल तयार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

श्रीनगर - देशविरोधी कारवायांबद्दल गुन्हा दाखल असलेल्या जम्मू-काश्‍मीरमधील 12 सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्याविरोधात अहवाल तयार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

हे सरकारी कर्मचारी महसूल, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण विकास आणि शिक्षण विभागात काम करीत होते, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी जम्मू-काश्‍मीरच्या राज्यघटनेतील कलम 126 चा आधार राज्य सरकारने घेतला. यातील काही कर्मचाऱ्यांना अटक झाली असून, त्यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे. काही जणांची जामिनावर मुक्तता झाली असून, काही जण अटक टाळण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

काश्‍मीरमध्ये अस्थिर वातावरण तयार करण्यासाठी चिथावणी देणे; तसेच हिंसाचार करण्यासाठी युवकांना भडकाविण्याचे काम करणाऱ्या 36 सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध राज्य पोलिसांच्या गुप्तचर विभागाने गेल्या महिन्यात अहवाल तयार केला होता. पुढील कार्यवाहीसाठी तो राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठविला होता.

मंत्र्यांवरही झाली होती कारवाई
देशविरोधी कारवाईत सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. त्यातील काही जणांना सेवेतून कमी करण्यात आले होते. 1990मध्ये उघडकीस आलेल्या अशा घटनेत पाच सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. सध्याचे शिक्षणमंत्री नईम अख्तर हे त्यापैकी एक आहेत. या कारवाईविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांनी तीन महिने संपाचा बडगा उगारल्याने संबंधित कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.

देश

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017