पलानीस्वामी होणार तमिळनाडूचे मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

शशिकला यांनी पक्षातील आपले वर्चस्व आणखी मजबूत करत निष्ठावंत पलानीस्वामी यांना विधिमंडळ नेतेपदी नेमले होते. त्यांचे दोन भाचे माजी खासदार टी.टी.व्ही. दिनाकरन आणि व्यंकटेशन या दोघांचे पुन्हा पक्षामध्ये पुनर्वसन केले होते.

चेन्नई - सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शशिकला यांचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगल्यानंतर त्यांनी नियुक्त केलेले निष्ठावंत ई. पलानीस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पलामीस्वामी यांना पंधरा दिवसात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले असून, आज सायंकाळी साडेचार वाजता ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

शशिकला यांनी पक्षातील आपले वर्चस्व आणखी मजबूत करत निष्ठावंत पलानीस्वामी यांना विधिमंडळ नेतेपदी नेमले होते. त्यांचे दोन भाचे माजी खासदार टी.टी.व्ही. दिनाकरन आणि व्यंकटेशन या दोघांचे पुन्हा पक्षामध्ये पुनर्वसन केले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर 'अण्णा द्रमुक'च्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी बंगळूरमधील विशेष न्यायालयामध्ये शरणागती पत्कारली. यानंतर त्यांची "परप्पन अग्रहार' तुरुंगात रवानगी करण्यात आली. 

शशिकलांनी दिनाकरन यांनी पलानीस्वामी यांची पक्षाच्या उपसरचिटणीसपदी नियुक्ती होती होती. तसेच विधिमंडळ नेतेपदी नियुक्त केले आहे. आज पलानीस्वामी यांच्यासह अन्य पाच नेते राज्यपालांच्या भेटीला होते. दिनाकरन यांच्यासाठी तर उपसरचिटणीस हे नवे पद तयार करण्यात आले आहे. शशिकला यांच्यानंतर पक्षात तेच दुसऱ्या स्थानी असतील. चिन्नम्मांच्या अनुपस्थितीमध्ये दिनाकरन हेच पक्षाचा कारभार पाहतील, हे निश्चित झाले आहे. तर, पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रीपदासाठी निमंत्रित केले.