राज्यपाल जंग यांची वर्तणूक हिटलरप्रमाणे - केजरीवाल

पीटीआय
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग हुकूमशहा हिटलप्रमाणे वागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या पावलावर ते पाऊल टाकत आहेत. जंग यांनी आपला आत्माच पंतप्रधानांना विकला आहे, अशा शब्दांत ट्‌विट करीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवल यांनी जंग यांच्यावर टीका केली आहे.

राज्य महिला आयोगावर सदस्य सचिव म्हणून राज्यपालांनी दिलराज कौर यांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे केजरीवाल व जंग याच्यात नव्याने वाद उफाळला आहे. यापूर्वीही राज्यपालांनी याच पदावर अलका दिवाण यांची नियुक्ती केली होती. त्यांची निवड घटनाबाह्य होती. सरकारने शिफारस केलेले नाव राज्यपालांनी नाकरल्याची टीका केजरीवाल यांनी केली होती. दिवाण यांच्या नियुक्तीमुळे आयोगाच्या कामकाजात मोठा अडथळा येत असल्याची टीका महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मलिवाल यांनीही केली होती. केजरीवाल यांच्या टीकेला हेदेखील एक कारण आहे.

देश

जो कुरआन में नहीं है, उसे कानून कैसे कहा जा सकता है...सर्वोच्च न्यालयाचे न्यायाधीश कुरियन यांनी निकाल देताना हे मत व्यक्‍त केले....

01.33 AM

मुझफ्फरपूर: पत्रकार राजदेव रंजन यांची हत्या व गुन्हेगारी कट रचल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय जनता दलाचे माजी खासदार महंमद...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: गुजरातमधील दहशतवाद प्रतिबंध पथकाने (एटीएस) बनावट पासपोर्ट रॅकेटचा भांडाफोड केला आहे. गुजरात व मुंबईमध्ये हे बनावट...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017