मदरशांत माध्यान्ह भोजन देण्याचा सरकारचा विचार

यूएनआय
मंगळवार, 17 जानेवारी 2017

नवी दिल्ली- मदरशांमधील जे विद्यार्थी मुख्य प्रवाहातील शिक्षण घेत आहेत त्यांना शाळेत आता माध्यान्ह भोजन मिळू शकते. याबाबतचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. 

केंद्रीय अल्पसंख्यांक राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले, "ज्या मदरशांमधून धार्मिक शिक्षणाशिवाय मुख्य प्रवाहातील विषय शिकवले जातात अशा मदरशांना आर्थिक मदत आणि माध्यान्ह भोजनाची सुविधा पुरविण्याचा विचार सरकार करीत आहे."

अल्पसंख्यांकांसाठी लाभदायक असणाऱ्या विविध योजनांबद्दल बोलताना नक्वी म्हणाले, "पंतप्रधानांचा नवीन 15 कलमी कार्यक्रम, नई मंजिल, नई रोशनी, सीखो और कमाओ, उस्ताद, मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकनंतरच्या शिष्यवृत्ती यांचा सर्व अल्पसंख्यांकांना लाभ झाला आहे. याशिवाय मेक इन इंडिया, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारख्या केंद्र सरकारच्या योजनांचाही लाभ झाला आहे."

मुलींसाठी देशभरात बेगम हजरत महल शिष्यवृत्ती आणि गरीब नवाझ कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, असेही नक्वी यांनी सांगितले.