जीएसटीबाबतच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका : अधिया

पीटीआय
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली - वस्तू व सेवा कर (जीएसटी) कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून, याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन महसूल सचिव हसमुख अधिया यांनी ट्‌विटद्वारे केले. जीएसटीची अंमलबजावणी आणखी पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्या होत्या. जीएसटी आणखी लांबणीवर पडणार असल्याच्या अफवांना लागलीच पायबंद बसावा, यासाठी अर्थ मंत्रालयाकडून परिपत्रकाद्वारे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.