गुजरातमध्ये भाजप बहुमताकडे; हिमाचलमध्ये आघाडीवर

Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites Narendra Modi Rahul Gandhi trend
Guajrat Result Gujarat Elections Marathi Websites Narendra Modi Rahul Gandhi trend

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सुरूवात झाली आहे. पहिल्या अर्ध्या तासात हाती आलेला कल सांगतो आहे, की दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. 

सकाळी साडे आठ वाजता समजलेला कल भाजपच्या बाजूने आहे. 

कल असा
गुजरात विधानसभा निकाल/कल: 
एकूण जागा: 182
भाजपः 87
काँग्रेसः 55
अपक्ष/इतर: 03

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल/कल: 
एकूण जागा: 68
भाजपः 16
काँग्रेसः 10
अपक्ष/इतर: 2

गुजरातमध्ये सत्ताधारी भाजप विजयी षट्‌कार ठोकणार, की मागील दोन दशकांपासून विरोधी बाकांवर बसलेला काँग्रेस पक्ष सत्ताधारी होणार, हे आज स्पष्ट होत आहे. हिमाचल प्रदेशचा मागील 24 वर्षांचा राजकीय इतिहास पाहता येथे काँग्रेस आणि भाजप आलटून पालटून सत्ताधीश झाल्याचे दिसते. यावेळेस जनता जनार्दन आपला कौल भाजपच्या बाजूने देते, की पुन्हा काँग्रेसला सत्ताधीश बनविते, हे थोड्याच वेळात समजणार आहे. 

#GujaratVerdict | Gujarat Assembly Election Result 

पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या वादळी सभांमुळे गुजरातमधील राजकारण चांगलेच तापले. उभय नेत्यांनी परस्परांवर केलेले आरोप- प्रत्यारोप राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरले. पाटीदार नेता हार्दिक पटेल, "ओबीसीं'चे नेतृत्व अल्पेश ठाकोर आणि दलित चेहरा जिग्नेश मेवानी हे तरुणतुर्क भाजपविरोधात एकत्र आल्याने येथील चुरस आणखीनच वाढली. 

हिमाचल प्रदेशात यंदा 75.28 टक्के एवढ्या रेकॉर्डब्रेक मतदानाची नोंद झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मतदानोत्तर चाचण्यांचा कल येथेही भाजपच्या दिशेने आहे. निवडणूक प्रचारात भाजपने येथे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसला लक्ष्य केले होते, तर काँग्रेसने वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा साधला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com