टीव्ही चॅनेल्सनी दिली दोन्ही पक्षांना विजयाची संधी !

gujarat and himachal election result
gujarat and himachal election result

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीला आज (सोमवार) सकाळी आठ वाजता सुरवात झाली. मतमोजणीला सुरवात झाल्यानंतर काही वेळातच विविध टीव्ही वाहिन्यांवर दोन्ही पक्षांना विजयाची संधी दिल्याचे चित्र पहायला मिळाले.

निवडणूकीचे निकाल सर्वप्रथम देण्याच्या लगीनघाईमध्ये विविध न्यूज चॅनेल्स सतत वेगवेगळी आकडेवारी देत होती. यामुळे कधी भारतीय जनता पक्ष तर कधी काँग्रेसची आघाडी होती. सतत हे आकडे बदलत होते. सर्वसामान्य नागरिकांना नेमके कोण पुढे आहे, हे समजेनासे होत होते.

मतमोजणीदरम्यान आकडेवारी सतत बदलतही असते. परंतु, निकालाची आकडेवारी देण्यासाठी आपणच सर्वांच्या पुढे आहोत, हे दाखवून देण्यासाठी अथवा आपणच कसे सर्वांच्या पुढे असून, टीआरपी मिळविण्यासाठी विविध चॅनेलनी दोन्ही पक्षांना विजयाची संधी दिल्याचे पहायला मिळाले. विविध ठिकाणांवरून वेगवेगळी आकडेवारी येत असल्यामुळे नागरिक संभ्रमात पडलेले दिसत होते.

गुजरात व हिमाचल प्रदेशात मतदान झाल्यानंतर विविध तज्ज्ञांनी अंदाज वर्तविले होते. अंदाज काही प्रमाणात जवळपास आला तर आम्ही कसे तज्ज्ञ आहोत अन् बदले तर 'त्यांची' कशी चूक झाली हे सांगण्यास तज्ज्ञ विसरत नाहीत. अर्थात हे सर्व अंदाजच असतात.

सकाळी आठ वाजल्यापासून सतत आकडे बदलते ठेवून चॅनेल्सनी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना खूष करून काही काळ आनंदोत्सव साजरा करण्याची जणू संधी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com