दहशतवादी हसनला गुजरात एटीएसने पकडले

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

अहमदाबाद - कोलकात्यातील अमेरिकन सांस्कृतिक केंद्रावर २००२ मध्ये हल्ला करणारा प्रमुख आरोपी हसन इमामुद्दीन (वय ४४) याला आज गुजरातच्या दहशतावादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली. तो अफताब अन्सारी आणि अझहर मसूद यांचा जवळचा सहकारी होता. 

हसनला बिहारमधील औरंगाबादमधून ताब्यात घेण्यात आले, गेल्या १५ वर्षांपासून तो फरारी असल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली. आज अटक केल्यानंतर गुजरात एटीएसने त्याला पुढील तपासासाठी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हसनने गया येथे आपले बस्तान बसविले होते व तो अरिफ हसन या बनावट ओळखीने येथे वास्तव्यास होता, अशी माहिती समोर आली आहे. एटीएसचे पोलिस अधीक्षक हिमांशु शुक्‍ल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हसन हा कोलकाता हल्ल्यासह अन्य काही हल्ल्यातही सहभागी होता. गुजरात पोलिसांनी केलेल्या बनावट चकमकीत असिफ रझा मारले गेल्यानंतर स्थापन झालेल्या ‘असिफ रझा खान कमांडो फोर्स’ (एकेआरसी) या संघटनेचाही तो सदस्य होता. 

भारतीय तटरक्षक दलाने रविवारी नऊ जणांसह एक पाकिस्तानी बोट पकडल्यानंतर आज पुन्हा केंद्रीय गृह विभागाने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना ॲलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानच्या कराची बंदरातून संशयास्पद लोक आणि शस्त्रास्त्रे घेऊन या बोटी निघाल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Gujarat ATS arrests terrorist Hasan