गुजरातमध्ये इसिसशी संबंधांवरून दोघांना अटक

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

या दोघांजवळून गन पावडर आणि काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दोघेही संगणकतज्ज्ञ आहेत. वसीम आणि नईम अशी या दोघांची नावे आहेत.

राजकोट - इसिसा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून (एटीएस) दोघांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून राजकोट आणि भावनगर येथून दोघांना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही सख्खे भाऊ असून, त्यांच्यावर बॉम्ब ठेवल्याचा आरोपही आहे. या दोघांची चौकशी करण्यात येत आहे.

या दोघांजवळून गन पावडर आणि काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दोघेही संगणकतज्ज्ञ आहेत. वसीम आणि नईम अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी 15 दिवसांपूर्वी गुजरातमधील एका धार्मिक स्थळी हल्ल्याची योजना केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे इसिसशी संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे.