यह कमाई मुझे देदे... मोदी, हा तर 'गब्‍बर सिंग टॅक्‍स'- राहुल गांधी

राहुल गांधी
राहुल गांधी

गांधीनगर : काँग्रेस सत्तेत असताना ज्या जीएसटी विधेयकाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता तो जेन्यून सिम्पल टॅक्स होता. सध्याच्या केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) म्‍हणजे 'गब्‍बर सिंग टॅक्‍स' आहे... ये कमाई मुझे दे दे, अशी खोचक टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. 

ट्विटच्या माध्यमातून राहुल यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांची गांधीनगर येथे सोमवारी सभा झाली. त्यावेळी ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी करून देशाच्या पायावर कुर्‍हाड मारली. देशापुढे बेरोजगारीचा प्रश्न असताना मोदी उद्योजकांचे खिसे भरत आहेत." 

सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी चौफेर टीका केली. मोदींचा 'मेक इन इंडिया' सपशेल अपयशी ठरला असून, तो 'फेक इन इंडिया' आहे. जीएसटीला गब्‍बर सिंग टॅक्‍स म्‍हणून जीएसटीची नवी व्याख्या करत यामध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्याचे राहुल  यांनी सांगितले. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व मोदींचे निकटवर्तीय अमित शहा यांचे पुत्र जय शहांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरूनही राहुल यांनी मोदींना लक्ष्य केले. 

राहुल गांधी म्‍हणाले : 

  • गुजरातमध्ये जनतेचे नव्हे तर उद्योगपतींचे सरकार आहे 
  • गुजरातमध्ये साणंद येथे नॅनोमध्‍ये पैसे गुंतवले. नॅनो दिसते कुठे? ३५ हजार कोटींमध्ये किती नॅनो बनल्‍या?
  • स्‍टार्टअप इंडिया अपयशी ठरले
  • मी गुजरातच्‍या जनतेचे जे दु:ख ऐकण्‍यासाठी येथे आलो
  • प्रत्‍येक शेतकर्‍याचे सरकार होईल, प्रत्‍येक मजुराचे, गरिबाचे सरकार होईल
  • नोटाबंदीतून मोदींनी अर्थव्‍यवस्‍थेवर कुर्‍हाड मारली
  • अमित शहांच्‍या मुलाबद्‍दल मोदी यांची मिठाची गुळणी
  • गुजरातचा आवाज विकत घेण्‍याचा कट
  • पंतप्रधान मोदी यांचे मेक इन इंडिया अपयशी ठरले
  • २४ तासांत केवळ ४५० लोकांना रोजगार मिळतो
  • बेरोजगारांची संख्‍या वाढतच आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com