कामाच्या ताणामुळे बँक कॅशियरची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 19 डिसेंबर 2016

गुजरातमधील थराड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कॅशियर प्रेम शंकर प्रजापती (वय 33) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रजापती यांची पत्नी मंजुळा यांनी कामाचा ताण अती असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे.

अहमदाबाद - नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांच्या रांगेत मृत्यू झाल्याचे समोर येत होते, पण आता बँकच्या कॅशियरनेच कामाच्या ताणामुळे आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.

गुजरातमधील थराड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे कॅशियर प्रेम शंकर प्रजापती (वय 33) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रजापती यांची पत्नी मंजुळा यांनी कामाचा ताण अती असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझे पती खूप तणावात होते. त्यांच्यावर कामाचा ताण खूप होता. त्यामुळे ते आमच्याशीही जास्तवेळ बोलू शकत नव्हते, असे मंजुळा यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी मात्र प्रजापती यांनी अन्य कोणत्या कारणामुळे आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. आत्महत्येच्या ठिकाणी चिठ्ठी सापडली नसल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.