गुजरात बंदला संमिश्र प्रतिसाद

रॉयटर्स
गुरुवार, 21 जुलै 2016

राजकोट - उनातील दलित तरुणांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ विविध संघटनांनी आज पुकारलेल्या गुजरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणांवर आंदोलकांनी गाड्यांवर दगडफेक करत रास्ता रोको आंदोलन केले. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पीडितांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील शुक्रवारी पीडितांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. 

उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रातील विविध दलित संघटनांनी आज जोरदार आंदोलन केले. किरकोळ हिंसाचाराच्या घटना वगळता आजचे आंदोलन शांततापूर्ण होते, असे पोलिसांनी नमूद केले. जुनागड आणि अमरेली भागातील वाहतूक या आंदोलनामुळे विस्कळित झाली होती. राजकोटमध्ये आंदोलन करणाऱ्या 50 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पाटणमध्ये आंदोलकांनी सिनेमागृहावर दगडफेक करत त्याची मोडतोड केली.

देश

बारमेर (राजस्थान) - एका अंधश्रद्धाळू डॉक्‍टरने उपचार सुरू असलेल्या रुग्णामध्ये शिरलेल्या भूतावर उपचार करण्यासाठी महिला रुग्णाच्या...

06.30 PM

नवी दिल्ली - बहुचर्चित वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. तत्पूर्वी 30 जून रोजी जीएसटीच्या...

05.57 PM

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) अंतिमत: आपले मौन सोडत...

02.30 PM