गुजरात विधानसभेत विरोधी आमदारांवर निलंबनाची कारवाई 

महेश शहा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

नलिया बलात्कारप्रकरणी गुजरात विधानसभेत घोषणाबाजी 

अहमदाबाद - अनेक भाजप नेत्यांचा समावेश असलेल्या आणि काही जणांना अटकही करण्यात आलेल्या नलिया लैंगिक छळ आणि बलात्कार प्रकरणावरून आज विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांनी विधानसभेत जोरदार घोषणाबाजी करत चौकशी मागणी लावून धरली. त्यानंतर अध्यक्षांनी विरोधी आमदारांवर एक दिवसासाठी निलंबनाची कारवाई केली. 

विधानसभेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आजच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल ओ. पी. कोहली यांचे भाषण सुरू असतानाच कॉंग्रेस आमदारांनी या सेक्‍स स्कॅंडलविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकारने विशेष तपास पथकाऐवजी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली. विधानसभा अध्यक्ष रमणलाल व्होरा यांनी राज्यपालांच्या भाषणापूर्वी या मुद्‌द्‌यावरील चर्चेची विरोधकांची मागणी फेटाळून लावत सभागृहाचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केले. त्यामुळे विरोधी आमदारांनी अध्यक्षांच्या दिशेने धाव घेत फलक झळकविले. त्यामुळे अध्यक्षांनी सर्व विरोधी आमदारांना आजपर्यंत एक दिवसासाठी निलंबित केले. सरकार भाजपच्या अन्य संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला यांनी केली. 

कॉंग्रेस कार्यकर्ते ताब्यात 
कॉंग्रेसने आज विधानसभेला घेराव घालण्याच्या दृष्टिकोनातून बेटी बचाओ रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली विधानसभा परिसरात येताच पोलिसांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोळंकी आणि काही महिलांसह 300पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 
 
देश

भाजप- काँग्रेसमध्ये भडकले वाक्‌युद्ध गोरखपूर: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गोरखपूरला भेट दिली. येथील...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

भोपाळ: भारतीय जनता पक्ष केवळ पाच-दहा वर्षे नव्हे तर, किमान 50 वर्षांसाठी सत्तेत आला आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाला आणखी मजबूत करत...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) औपचारिक सहभागी झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू)...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017