मोदी सरकारकडून नॅनो प्रकल्पाला 35 हजार कोटी : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद : काँग्रेस सरकारने 35 हजार कोटी मनरेगा योजनेला दिले; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेवढेच पैसे टाटा-नॅनो प्रकल्पाला दिले, असा आरोप आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी साबरकांठा येथील जाहीर सभेत केला. गुजरात विधानभेच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोचली असून, अक्षरधाम मंदिरात दर्शन घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी सभेत मार्गदर्शन केले.

राहुल यांनी सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका केली. राहुल गांधी म्हणाले, की जीएसटी विधेयक हे केवळ भारताचा आर्थिक कणा मोडण्यासाठीच लागू केले आहे. या कायद्याचा फायदा केवळ पाच ते सहा उद्योगपतींना झाला आहे. दिल्लीत सध्या असे सरकार बसले आहे, की 8 नोव्हेंबरच्या रात्री घोषित करते, की येत्या चार तासांत नोटाबंदी होत आहे. देशातील नागरिकांच्या मनात काय चालले आहे, हे त्यांना ठाऊक नाही, असेही राहुल म्हणाले. राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या प्रचार दौऱ्यावर असून, त्यात उत्तर गुजरातमधील सहा जिल्ह्यांतील सभांचा समावेश आहे. याशिवाय महिला, ग्रामस्थ आणि विविध समुदायांतील लोकांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. तत्पूर्वी सौराष्ट्र, मध्य गुजरात आणि दक्षिण गुजरातचा दौरा केला होता.