"बीएसएफ'ने घेतले दोन पाक नागरिक ताब्यात

वृत्तसंस्था
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

कच्छ: केंद्रीय सुरक्षा संस्थेने अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीवरील हरामी नाला येथे पकडलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यांच्या तीन बोटींसह ताब्यात घेतले आहे.

कच्छ: केंद्रीय सुरक्षा संस्थेने अरबी समुद्रात गुजरात किनारपट्टीवरील हरामी नाला येथे पकडलेल्या दोन पाकिस्तानी नागरिकांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) त्यांच्या तीन बोटींसह ताब्यात घेतले आहे.

केंद्रीय सुरक्षा संस्थेच्या पथकाची गस्त सुरू असताना हरामी नाला येथे त्यांना पकडण्यात आले. मात्र, अन्य पाच पाक नागरिकांना बोटी सोडून पळून जाण्यात यश आले, असे "बीएसएफ'च्या वतीने सांगण्यात आले. या बोटींची तपासणी केली असता त्यामध्ये मासेमारीचे साहित्य आढळून आले. चालू वर्षांत एप्रिलमध्ये याच परिसरातून बेकायदा घुसणारी बोट "बीएसएफ'ने ताब्यात घेतली होती, तर फेब्रुवारीमध्ये "बीएसएफ'च्या गस्त घालणाऱ्या पथकाने चार बोटी ताब्यात घेतल्या होत्या. भारतीय तटरक्षक दलाने गेल्या वर्षी 20 डिसेंबर रोजी 26 पाकिस्तानी मच्छीमारांना त्यांच्या पाच बोटींसह ताब्यात घेतले होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या
कलमाडींचे सक्रिय राजकारणात सहभागाचे संकेत 
मंत्रिमंडळ विस्तार व खातेपालट - अन्वयार्थ 
बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू
नाशिक: गणेशोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून अनाथ मुलांना ड्रेसचे वाटप
बाप्पाच्या निरोपासाठी लोटला जनसागर
रस्त्याच्या मालकीवरून पर्यटकांची कोंडी
माहितीच्या सुरक्षेला कुठे आहे 'आधार'? 
'त्यांनी' विद्यार्थीच नव्हे, तर गावालाही घडवले 
नागरिक बनले पोलिस अधिकारी