जुनागडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिला ठार

वृत्तसंस्था
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

अहमदाबाद: जुनागड जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन महिला मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

अहमदाबाद: जुनागड जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन महिला मृत्युमुखी पडल्या, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

गीर वन विभागातील मेनदरदा गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मुकाबेन कनानी (वय 50) मरण पावल्या, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कनानी या आपल्या झोपडीत झोपल्या होत्या त्या वेळी बिबट्याने त्यांना ओढत नेले आणि तिच्यावर हल्ला केला, असे उपवनसंरक्षक प्रदीप सिंह यांनी सांगितले. मृत मुकाबेन कनानी या आपल्या झोपडीत झोपल्या होत्या त्या वेळी बिबट्याने त्यांना ओढत नेले आणि त्यांच्या हल्ला करून त्यांना ठार केले. त्यानंतर वन अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली, आम्ही बिबट्याचा शोध घेत असून त्याला पिंजऱ्यात बंदी करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गीर-सोमनाथ वन विभागातील मलिया गावात बिबट्याच्या हल्ल्यात एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. राजूबेन कोली असे या महिलेचे नाव आहे. मालिया गावातील आपल्या घराच्या व्हरांड्यात त्या झोपलेल्या असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला, असे उपवनाधिकाऱ्यांनी सांगितले.