मोदींच्या गुजरात विजयामागे आहेत ही सात कारणे...

Gujrat Verdict Gujrat Elections Factors of Modi Success Formula
Gujrat Verdict Gujrat Elections Factors of Modi Success Formula

अत्यंत बिकट परिस्थितीत गुजरातमध्ये विजय खेचून आणणाऱया भाजपला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच अखेर मदतीला धावून आले आहेत. काँग्रेसने उभे केलेले कडवे आव्हान मोडून काढण्यासाठी मोदींना काँग्रेसचे मणिशंकर अय्यर यांचे वादग्रस्त विधानही मदतीला आले असल्याचे दिसते आहे. 

गुजरात विजयात महत्वपूर्ण ठरलेले 7 मुद्दे:

  1. GST
    जीएसटीवरून गोंधळ माजला असताना आणि व्यापाऱयांचा रोष वाढत असताना नरेंद्र मोदींनी करप्रणालीत आणखी बदल केले आणि काही करांचे दर कमी केले. गुजरातमधील व्यापारी समुदायाने या निर्णयाचे स्वागत केल्याचे मतदानावरून दिसते आहे. 
     
  2. हार्दिक पटेल Sex Tape
    हार्दिक पटेलच्या कथित लैंगिंक संबंधांची सीडी निवडणुकीपूर्वी प्रसारित झाली. गुजराती समाज मुळात अत्यंत पारंपरिक आहे. लैंगिंक संबंधासारख्या विषयावर बोलताना हार्दिकने जरी धाडसी भूमिका घेतली असली, तरी गुजराती समाजाला ती फारशी रुचल्याचे दिसत नाही. 
     
  3. निझामी with Rahul Gandhi
    काश्मिरचा फुटीरतावादी नेता सलमान निझामी हा राहूल गांधी यांच्या प्रचार सभेत होता. अफझल गुरू आणि भारतविरोधी निझामीने केलेले ट्विटस् मोदी यांनी प्रकाशात आणले. त्यातून मतदारांचे धृवीकरण होण्यास मदत झाली, असे मानता येऊ शकते. 
     
  4. अय्यर यांचे Neech बोल
    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी निवडणूक प्रचार एेन भरात असताना मोदी यांना उद्देशून 'नीच' हा शब्द वापरला. त्याचा फायदा मोदींनी उठवला आणि जातीचा आधार घेत गुजराती मतदारांची सहानभुती मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.
     
  5. Anti पाकिस्तान
    गुजरातच्या निवडणुकीत पाकिस्तानला ओढून मोदींनी प्रचाराचा रोख थेट देशविरोधी आणि देशभक्त असा बदलवून टाकला. गुजरात निवडणूक जिंकण्यासाठी पाकिस्तानची छुपी मदत काँग्रेस घेत असल्याचा आरोप झाल्यामुळेही मतदारांचे धृवीकरण झाले असावे. 
     
  6. Sea Plane आणि विकास
    सी प्लेन आणि अन्य विकास प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थेट निवडणुकीच्या टप्प्यात उद््घाटन केले. या प्रकल्पांच्या माध्यमातून मोदींचे गुजरातवर किती लक्ष आहे आणि गुजरातच्या विकासासाठी ते काम करत आहेत, हा संदेशही मतदारांपुढे पोहोचला. 
     
  7. स्वस्त शेती कर्जे
    गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी निवडणुकीपूर्वी स्वस्त शेती कर्जाची घोषणा केली. शेतकऱयांना तीन लाख रुपयापर्यंतचे कर्ज शुन्य टक्के व्याजदराने देण्याची ही योजना तब्बल 25 लाख शेतकरी असलेल्या गुजरातमध्ये प्रभावी ठरली असल्याचे स्पष्ट झाले. 

गुजरात, हिमाचल प्रदेश निकालाच्या आणखी बातम्या:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com