भारतीय जवानांनी केला 2 दहशतवाद्यांचा खात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 15 मार्च 2017

एक पोलिस जखमी

भारतीय फौजांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. या कारवाईमध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, अद्याप हा गोळीबार सुरूच असल्याचे सांगण्यात आले.

श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील जुगतियाल येथे झालेल्या चकमकीत भारतीय फौजांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्या ठिकाणी अद्याप गोळीबार सुरू असून, भारतीय जवान कारवाई करीत आहेत. 

केंद्रीय राखवी पोलिस दल (CRPF), राष्ट्रीय रायफल्स, जम्मू-काश्मीर पोलिस आणि विशेष कारवाई पथक यांनी संयुक्तपणे आज (बुधवार) सकाळी कलारूस भागात दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली तेव्हा त्यांच्यात चकमक सुरू झाली. 

तेथील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दोन-तीन दहशतवादी असल्याची खबर लष्कराच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार भारतीय सुरक्षा फौजांच्या जवानांनी नेमक्या माहितीच्या आधारावर जुगतियाल भागाला वेढा दिला. 

सैन्याने वेढा दिल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यामुळे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. या कारवाईमध्ये एक पोलिस कर्मचारी जखमी झाला असून, अद्याप हा गोळीबार सुरूच असल्याचे सांगण्यात आले.