kumaraswamy
kumaraswamy

मी आघाडीचे विष पित आहे; कुमारस्वामींना अश्रू अनावर

बंगळुर : आघाडी सरकार चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. मला खूप त्रास सहन करावा लागत आहे, मी आघाडीचे विष पित आहे. मनात आले तर दोन तासांत मुख्यमंत्रीपदाचा त्याग करीन हे शब्द आहेत हताश मुख्यमंत्री कुमारस्वामींचे. यावेळी कुमारस्वामींना अश्रूही अनावर झाले.

कर्नाटकात सत्ता येऊन दोन महिनेही होत नाहीत, तोवर काँग्रेस आणि जेडीयूमध्ये मोठ्या कुरबुरी सुरू आहे. कर्नाटकातील हे सरकार किती वर्षे चालणार अशी शंका प्रारंभीपासूनच घेतल्या जात होती. त्याला खुद्द मुख्यमंत्री कुमारस्वामींनीच दुजोरा दिला आहे. 2019 पर्यंतही हे सरकार टिकणार नाही अशी भविष्यवाणी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी केली होती, मात्र काँग्रेसने त्यांना तोंडाला कुूलूप लावण्याचा आदेश दिला होता. दोन्ही पक्षात मतभेद सुरू असल्याचे चित्र पाहण्यास येथे मिळत आहे. 

कुमारस्वामी यांनी एका जाहीर सभेत बोलताना म्हटले आहे, की आपण सर्वजण मला शुभेच्छा देता आहात पण, मी किती दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिन हे मला माहीत नाही. मी आघाडीचे विष पित आहे. मला खूप त्रास होत आहे. काँग्रेसचे उपमुख्यमंत्री परमेश्‍वर यांनाच माहीत असेल की मी किती दिवसाचा मुख्यमंत्री आहे ते? तुम्ही पुष्पगुच्छ घेऊन येता कारण तुम्हाला वाटते की तुमचा भाऊ मुख्यमंत्री बनला आहे. तुम्ही सर्वजण आनंदी आहात मात्र मी नाही. माझे शरीर विषाने भरले आहे. कधी मनात विचार येतो की नको हे मुख्यमंत्रीपद. खरेतर माझे वडील देवेगौडा यांचे हे स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचे आहे ते स्वप्न पूर्णत्वास जाईल की नाही माहीत नाही. परमेश्‍वरानी मला मुख्यमंत्री केले आहे तेच ठरवतील मला या पदावर किती दिवस ठेवायचे. 

दोन्ही पक्षात कुरघोडी सुरू असून कुमारस्वामी काँग्रेससोबत किती दिवस संसार करतील याविषयी शंका घेतल्या जात आहे. मात्र कुमारस्वामींच्या या विधानावर उपमुख्यमंत्री परमेश्‍वर म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी आनंदी राहायला हवे, जर ते आनंदी राहिले तरच आम्हीही आनंदी राहू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com