हजला जाणारे मुस्लिमही 'हिंदूमुस्लीम'च : मोहन भागवत

Haj Muslims are also Hindu Muslims says Mohan Bhagwat
Haj Muslims are also Hindu Muslims says Mohan Bhagwat

नवी दिल्ली : मुस्लिमांच्या हज या पवित्र यात्रेला जाणारे भारतातील मुस्लिमही हिंदु मुस्लिमच असल्याचे मत आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे. 'भविष्यातील भारत- रा. स्व. संघाचा दृष्टिकोन' या विषयावर भागवत यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेतील दुसऱ्या दिवशी ते विज्ञान भवन नवी दिल्ली येथे बोलत होते.

तसेच, हिंदुत्व म्हणजे समावेशकता आणि मुस्लीमांना आपले मानणे हा त्याचाच एक भाग आहे. हिंदू राष्ट्र म्हणजे तेथे मुस्लिमांना जागा नाही, असा होत नाही. जर आपण मुस्लिमांना स्वीकारत नसू तर ते हिंदुत्व नाही. हिंदुत्व हे भारतीयत्व आणि सर्वसमावेशकता आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज (ता.19) केले.

विविधतेत एकता मानून सर्वाचा सार्वांगीण विकास साधणे हे हिंदुत्वाचे मूळ तत्त्व आहे. त्यामुळे इथला मुस्लीम हिंदुत्वाला वर्ज्य नाही. हिंदुत्व असा शब्द वापरायचा नसेल तर नका वापरू, भारतीय म्हणा. पण या शब्दाला संघाचा विरोध नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. आधुनिक भारत हा राज्यघटनेवर आधारलेला असून देशातील प्रत्येक नागरिक घटनेला बांधला गेलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघदेखील राज्यघटनेला श्रेष्ठ मानतो आणि त्याच्या चौकटीत राहूनच काम करतो, असे प्रतिपादन मोहन भागवत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com