केजरीवाल यांना हार्दिक पटेलांचा पाठिंबा

वृत्तसंस्था
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016

अहमदाबाद - सध्या गुजरात राज्याच्या चार दिवसीय दौऱ्यावर असलेले दिल्ली राज्याचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना येथील पटेल आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी पाठिंबा दर्शविला आहे. 

पटेल समुदायास ओबीसी दर्जा देण्याच्या मागणीस पाठिंबा दिल्यास "पाटीदार अनामत आंदोलन समिती‘ केजरीवाल यांनाही पाठिंबा देईल, असे हार्दिक यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. याचबरोबर, गुजरातमधील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने "लोकशाही चिरडून टाकल्यामुळे‘ पाटीदार समुदायाचा मुद्दा दिल्लीमध्ये उपस्थित करावा, असे आवाहनही या पत्राच्या माध्यमामधून करण्यात आले आहे. 

केजरीवाल हे उद्या (रविवार) सुरतमध्ये सभा घेणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर, हार्दिक यांचे हे आवाहन महत्त्वपूर्ण मानले जात आहे.