गंगा किनारी सापडल्या 500च्या साडेचार लाख नोटा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

हरिद्वार- येथील गंदा नदीच्या किनारी असलेल्या बिर्ला घाटाजवळ कचरा गोळा करताना एका युवकाला पाचशे रुपयांच्या जुना नोटा सापडल्या असून त्या 4.59 लाख रुपये एवढ्या रकमेच्या आहेत.

गंगा नदीच्या किनारी कचरा गोळा करत असताना एकाला झाडाच्या झुडपात एक पिशवी आढळून आली होती. या पिशवीमध्ये पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा होत्या. त्या 4.59 लाख रुपये एवढ्या रकमेच्या आहेत. याप्रकरणी बबन (वय 36) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बबन हा नदी किनारी कचरा गोळा करत होता. यावेळी त्याला एका झाडाजवळ एक पिशवी आढळून आली. पिशवी उघडल्यानंतर त्यामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा व काही दगड आढळून आले. यावेळी पिशवीमध्ये 4.59 लाख रुपये होते. परंतु, त्याने अन्य दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले व काही पैशांची खरेदी केली होती. पिशवीमधील काही नोटा खराब झाल्या होत्या. खराब झालेल्या नोटा नदीमध्ये फेकत असताना नागरिकांनी पाहिले व याबाबतची माहिती पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

बबनच्या ताब्यातून 4.35 लाख रुपयांच्या नोटा घेतल्या असून, त्या आयकर विभागाकडे दिल्या आहेत. बबनला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स

देश

नवी दिल्ली: वस्तू उत्पादनासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पेट्रोलियम पदार्थांवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) राज्यांनी कमी करावा, अशी...

05.03 AM

शेतकरी आंदोलनाबाबत प्रश्‍न अपेक्षित नवी दिल्ली: भाजपच्या तेरा मुख्यमंत्र्यांची तिसरी आढावा बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...

04.03 AM

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, चंडीगड प्रशासनाला नोटीस नवी दिल्ली : बलात्कारातून मूल झालेल्या दहा वर्षे वयाच्या मुलीसाठी दहा लाख...

03.03 AM