"पद्मावत'वर आता हरियानातही बंदी

पीटीआय
मंगळवार, 16 जानेवारी 2018

संजय लीला भन्साळी यांच्या या वादग्रस्त चित्रपटाला समाजातून मोठा विरोध असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने "पद्मावत'वर बंदी घालावी, अशी मागणी आपण केली

चंदिगड - गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशपाठोपाठ हरियानानेही "पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. आरोग्य मंत्री अनिल विज यांनी हा निर्णय मंगळवारी जाहीर केला.

""या चित्रपटातून इतिहासाची मोडतोड केल्याची लोकांची भावना लक्षात घेऊन राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला,'' अशी माहिती विज यांनी दिली. ""यापूर्वीच्या बैठकीतही आपण "पद्मावत'वर बंदी घालण्याची मागणी केली होती. "सेन्सॉर'कडून या चित्रपटाला परवानगी मिळाल्यानंतर त्यावर राज्यातील बंदीचा निर्णय घेण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी दिले होते. आजच्या बैठकीतही आपण हा मुद्दा उपस्थित केला. संजय लीला भन्साळी यांच्या या वादग्रस्त चित्रपटाला समाजातून मोठा विरोध असून राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने "पद्मावत'वर बंदी घालावी, अशी मागणी आपण केली,'' अशी माहिती विज यांनी दिली.

Web Title: Haryana bans release of Padmavat