मी चेहरा का लपवू?; आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीचे धाडस

वृत्तसंस्था
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

अशा प्रकरणात दोषींना जोपर्यंत शासन होत नाही, तोपर्यंत अधिकाधिक मुलींना अशा घटनांना सामोरे जावे लागेल. माझ्यासारख्या सर्व मुली सुदैवी नसतात. या प्रकरणात मोठा लढा उभारावा लागणार आहे. 

चंदिगड : बलात्काराचा प्रयत्न झाल्याने माध्यम प्रतिनिधींनी चेहरा झाकून प्रतिक्रिया देण्यास सांगितल्यानंतर त्या पिडीतेने मी चेहरा का लपवू असे सांगत ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांनीच चेहरा लपवायला हवा. त्यानंतर तिने आपला चेहरा न झाकता बेतलेल्या प्रसंगाविषयी माध्यमांना माहिती दिली.

आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने आज (सोमवार) सर्व माध्यमांमध्ये आपल्यावर घडलेल्या प्रसंगाबाबत माहिती दिली. हरियाना भाजपचे प्रमुख सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला व त्याच्या अन्य एका साथीदाराने पाठलाग करण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तिने दाखल केली आहे. या दोघांना अटक करण्यात आली आणि त्यांची जामीनावर सुटकाही करण्यात आली आहे. हरियानात बेटी बचाओचा नारा देण्यात येत असताना भाजप नेत्याच्या मुलावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

या मुलीने फेसबुकवर पोस्ट लिहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. त्यानंतर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. चंदिगडच्या रस्त्यावर माझे अपहरणच झाले होते, असे शीर्षक देऊन तिने या प्रकरणाची सर्व माहिती लिहिली आहे. तिचे वडील अतिरिक्त मुख्य सचिव असून, त्यांनीही तिला पाठींबा दिला आहे. तिने लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, की अशा प्रकरणात दोषींना जोपर्यंत शासन होत नाही, तोपर्यंत अधिकाधिक मुलींना अशा घटनांना सामोरे जावे लागेल. माझ्यासारख्या सर्व मुली सुदैवी नसतात. या प्रकरणात मोठा लढा उभारावा लागणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: Haryana BJP chief Subhash Barala after his son allegedly stalked a woman