महिला सुरक्षिततेसाठी हरियानामध्ये 'ऑपरेशन दुर्गा'

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 एप्रिल 2017

महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऑपरेशन दुर्गा' ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 72 जणांना ताब्यात घेतले आहे.

चंदीगड (हरियाना) - महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारने महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी "ऑपरेशन दुर्गा' ही मोहिम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी आतापर्यंत 72 जणांना ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महिलांची छेडछाड करणाऱ्या रोमिओंविरूद्ध कारवाईची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेतून प्रेरित होऊन इतर काही राज्यांतही महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. हरियाणामध्ये 'ऑपरेशन दुर्गा' मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत पोलिसांनी 24 भरारी पथकांची स्थापना केली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांची छेडछाड करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे.

याबाबत वृत्तसंस्थेशी बोलताना एका महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणाले की, "महिलांच्या सुरक्षिततेसाठी हरियाना सरकारची "ऑपरेशन दुर्गा' ही एक चांगली मोहिम आहे. मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला बहुमोल वेळ व्यर्थ घालवू नये. त्यांनी आपले काम, अभ्यास आणि इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे. अलिकडच्या काळात लक्ष विचलित झालेल्या तरुणांना योग्य मार्गावर आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.'

"एखादे चांगले पाऊल उचलले तर त्यात वाईट काय आहे?', असे म्हणत विविध ठिकाणांवरून मिळालेल्या तक्रारींमुळे भरारी पथकांची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचे माध्यम सल्लागार अमित आर्य यांनी दिली.