गुरमीतवरील खून खटल्याचा अंतिम युक्तिवाद सुरू

वृत्तसंस्था
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

पंचकुला: डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याच्याविरुद्ध दाखल दोघांच्या हत्या प्रकरणाच्या अंतिम युक्तिवादास आज सुरवात झाली. सीबीआयच्या विशेष न्यायालयात ही सुनावणी सुरू असून, न्यायालय सोमवारी गुरमीतची बाजू ऐकून घेणार आहे.

पत्रकार राम चंदर छत्रपती व डेराचा मॅनेजर रंजीत सिंग यांची हत्या केल्याचा आरोप गुरमीतवर असून, या प्रकरणाची सुनावणी आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जगदीप सिंग यांच्या पीठासमोर झाली. या वेळी गुरमीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीस उपस्थित होता. कडेकोट बंदोबस्तात झालेल्या या सुनावणीनंतर न्यायालय सोमवारी गुरमीतची बाजू ऐकून घेणार आहे.

छत्रपती यांनी गुरमीतची भांडाफोड केल्यानंतर त्यांची 2002 मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती; तर याचवर्षी जुलै महिन्यात रंजीत याचीही हत्या झाली होती.

नव्याने जबाब नोंदविण्याची खट्टाची मागणी
गुरमीतचा चालक खट्टा सिंग याने आपला जबाब नव्याने नोंदवावा, असा अर्ज न्यायालयात दाखल केल्याची माहिती त्याचे वकील नवकिरण सिंग यांनी दिली. खट्टा सिंग हा छत्रपती व रंजीत सिंग यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य साक्षीदार असून, याप्रकरणी 2012 मध्ये त्याचा जबाब नोंदविण्यात आला होता. तो मागे घेण्याची विनंती खट्टा याने केली आहे. हा जबाब त्याने गुरमीत व संबंधितांच्या दबाबाखाली नोंदविल्याचे नवकिरण यांनी म्हटले आहे. त्याच्या अर्जावर 22 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.