कोळसा घोटाळ्यात आणखी सात खटले 

वृत्तसंस्था
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

मे. जिंदाल स्टिल आणि पॉवर लिमिटेडसह दोन कंपन्यांविरोधात तपास आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही ईडीने कोर्टात दिली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून ते या सप्टेंबर महिन्याच्या काळात कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या चौकशीचा दहावा प्रगती अहवाल ईडीने कोर्टापुढे सादर केला.

नवी दिल्ली : कोळसा खाणींच्या वाटपातील घोटाळ्याच्या आणखी सात खटले दाखल करण्यात आल्याची माहिती ईडी अर्थात केंद्रीय सक्त अंमलबजावणी संचालनालयाने आज सुप्रीम कोर्टात दिली. 

मे. जिंदाल स्टिल आणि पॉवर लिमिटेडसह दोन कंपन्यांविरोधात तपास आणि तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहितीही ईडीने कोर्टात दिली. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यापासून ते या सप्टेंबर महिन्याच्या काळात कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या चौकशीचा दहावा प्रगती अहवाल ईडीने कोर्टापुढे सादर केला. त्यावेळी ही माहिती देण्यात आली. 

जिंदाल कंपनीसोबतच मे. अमर आयर्न आणि स्टिल प्रा. लि. तसेच मे. नव भारत पॉवर. प्रा. लि. यांच्या विरुद्ध प्रकरण दाखल करण्यात येणार आहे. शिवाय ग्रेस इंडस्ट्रीज, मे. कमल स्पॉंज स्ट्रील ऍण्ड पॉवर लि. विरोधातही प्रकरण दाखल करण्यात येणार असल्याचे ईडीने सांगितले. त्यानंतर कोर्टाने पुढील प्रगती अहवाल 4 डिसेंबर रोजी सादर करण्याचे निर्देश दिले.