पाकमध्ये गेलेले धर्मगुरु सोमवारी परतणार

वृत्तसंस्था
रविवार, 19 मार्च 2017

सुषमा स्वराज यांनी आज ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दोन्ही धर्मगुरु सुखरुप असून, ते सोमवारी भारतात परतणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दोघांचे मुत्तहिदा कौमी चळवळीशी संबंध असल्याने त्यांना अटक केल्याचे समजते. 

नवी दिल्ली - दिल्लीतील हझरत निझामुद्दिन दर्ग्याचे हरविलेले दोन धर्मगुरू पाकिस्तानी गुप्तचर खात्याच्या ताब्यात असून, ते सोमवारी पुन्हा भारतात परतणार आहेत. आज (रविवार) परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी त्यांच्याशी चर्चा केली.

सुषमा स्वराज यांनी आज ट्विट करत याबाबतची माहिती दिली. दोन्ही धर्मगुरु सुखरुप असून, ते सोमवारी भारतात परतणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. या दोघांचे मुत्तहिदा कौमी चळवळीशी संबंध असल्याने त्यांना अटक केल्याचे समजते. 

सैयद असिफ निझामी आणि त्यांचा पुतण्या नझिम निझामी अशी त्यांची नावे असून त्यांना लाहोरमधील अल्लमा इकबाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 14 मार्चला ताब्यात घेण्यात आले होते. असिफ निझामी हे दिल्लीतील दर्ग्याचे प्रमुख धर्मगुरू आहेत. आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पाकिस्तानात ते गेले होते, परंतु परतताना त्यांना अटक झाली. 14 मार्चपासून त्यांच्याशी संपर्क न झाल्याने ते हरविल्याचे मानले जात होते, परंतु त्यांना पाकिस्तानी गुप्तचर खात्याने अटक केल्याची माहिती समोर आली.