हिंदू मुलीचा जीव वाचविण्यासाठी त्याने सोडला रोजा

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

भारतीय सैन्यात देशाची सेवा करणारे जवान रमेश सिंह यांच्या दोन दिवसांच्या मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. अश्फाक याने रक्त देऊन तिला नवीन जीवनदान दिले. बिहार मधील दरभंगा जिह्यातील या तरुणाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 

दरभंगा (बिहार) : मुस्लिमांसाठी रमजानचा महिना सर्वांत पवित्र मानला जातो. या काळात सुर्योदयानंतर आणि सुर्यास्तापूर्वी अन्न-पाणी न घेता कडक उपवास केले जातात. परंतु, एका दोन दिवसांच्या चिमूरडीसाठी मोहम्मद अश्फाक या तरुणाने आपला रोजा सोडला. 

भारतीय सैन्यात देशाची सेवा करणारे जवान रमेश सिंह यांच्या दोन दिवसांच्या मुलीला तातडीने रक्ताची गरज होती. अश्फाक याने रक्त देऊन तिला नवीन जीवनदान दिले. बिहार मधील दरभंगा जिह्यातील या तरुणाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. 

याविषयी मोहम्मद अश्फाक म्हणाला, "माझ्या मते एखाद्याचा जीव वाचविणे सर्वांत महत्त्वाचे आहे. ही एका सैनिकाची मुलगी आहे. त्यांच्यापासूनच मला ही प्रेरणा मिळाली."

एकाबाजूला हिंदू-मुस्लिम असा वाद सुरू असताना, दुसरीकडे धर्मापेक्षा माणूस मोठा असे मानणारे लोकही आहेत. अशा घटनांमुळे मानवी समाजाला बंधुत्वाचा संदेश मिळतो. अशा प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहेत.

Web Title: he breaks rajmzan fast to save girl's life