'चोर' डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही: राहूल गांधी 

He Cant Look Me In The Eye Because says Rahul Gandhi
He Cant Look Me In The Eye Because says Rahul Gandhi

बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा राफेल करारावरून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, चोरी करणारा माणूस कधीच डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही आणि नरेंद्र मोदी यांनी राफेल करारात चोरी केली आहे, या करारात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला आहे, त्यामुळे त्यांची आपल्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही. राहुल गांधी आज (ता.13) बंगळूरुमध्ये एका प्रचारसभेत बोलत होते.

जयपुर येथील प्रचारसभेतही त्यांनी नरेंद्र मोदीं यांच्यावर राफेल करारावरून भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. राफेल करारावरून नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना राहूल गांधी यांनी म्हटले आहे की, एचएएल ही कंपनी 70 वर्षांपासून विमाने बनवत आहे, तर अनिल अंबानी यांच्या कंपनीने त्यांच्या आयुष्यात कधीच विमान बनवलेले नाहीत तरीसुद्धा, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कंपनीसोबत विमाने बनवण्याचा करार केला. ही कंपनी 10 दिवसांपूर्वी बनवली गेली आणि तिच्यासोबत करार करण्यात आला. यातील 36 विमाने ही भारतात बनणार नाहीत ती फ्रान्समध्ये बनणार आहेत. या सर्व गोष्टींवर मी लोकसभेत चर्चा केली परंतु, यावर पंतप्रधान मोदी उत्तर द्यायला तयार नाहीत.

यावेळी, बोलताना राहुल गांधी यांनी संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी खोटे बोलून देशातल्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोपही केला. राफेल कराराची माहिती गुप्त ठेवण्यात आली असल्याची सांगण्यात येत आहे. याबाबत आपण फ्रान्सच्या राष्ट्रपतीसोबत चर्चा केली असल्याचेही राहूल गांधी यांनी सांगितले. परंतु, फ्रान्सचे राष्ट्रपती भारत सरकारने सूचना दिल्यास ही माहिती उघड करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले. परंतु, या करारामध्ये भ्रष्टाचार झाला असल्याने भारत सरकार ही माहिती खुली करण्यास असमर्थ दिसत आहे. चौकीदारच भागीदार असल्याचा पुनरुच्चारही राहुल गांधी यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com