'मोदींप्रमाणे मी पण लोकांना मूर्ख बनवणार!'

वृत्तसंस्था
शनिवार, 28 जानेवारी 2017

नवी दिल्ली : एवढ्या मोठ्या देशात जर कोणी 125 कोटी जनतेला मूर्ख बनवून पंतप्रधानपदी विराजमान होत असेल, तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे वक्तव्य दक्षिण आग्रा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोपाल चौधरी यांनी केले आहे.

नवी दिल्ली : एवढ्या मोठ्या देशात जर कोणी 125 कोटी जनतेला मूर्ख बनवून पंतप्रधानपदी विराजमान होत असेल, तर आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असल्याचे वक्तव्य दक्षिण आग्रा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोपाल चौधरी यांनी केले आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चौधरी हे दक्षिण आग्रा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आपण लोकांना मूर्ख बनवून पैसे कमावण्यासाठी राजकारणात आलो आहोत, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी व्हिडिओमधून केले आहे. "राजकारणात जे येतात ते पैसे कमावतात आणि स्वत:चे घर भरून घेतात. सर्वच राजकीय पक्षाचे नेते, आमदार, खासदार पैसे कमवत आहेत', असा दावा चौधरी यांनी केला आहे. याशिवाय, विकासकामांसाठी जो निधी लोकप्रतिनिधींना उपलब्ध होतो, त्यापैकी काही टक्के रक्कम लोकप्रतिनिधींना मिळते,  असे वक्तव्यही त्यांनी केले आहे.

उत्तर प्रदेशमधील विधासनभा निवडणुकीसाठीची 11 फेब्रुवारीपासून 8 मार्चपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. तर, 11 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

देश

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र, चंडीगड प्रशासनाला नोटीस नवी दिल्ली : बलात्कारातून मूल झालेल्या दहा वर्षे वयाच्या मुलीसाठी दहा लाख...

03.03 AM

अहमदाबाद: गुजरातमधील सरिस्का येथील प्रसिद्ध गीर अभयारण्यात दोन सिंहांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये एका सिंहिणीचाही...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

अहमदाबाद: उत्तर प्रदेशमधील गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात ऑक्‍सिजनअभावी 60 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच...

शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017