सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर पोलिसाची आत्महत्या

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

पाल यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. पोलिस याचा शोध घेत आहेत. आज सकाळी सात वाजता ते कामावर आले होते.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या गेटवर सेवा बजावत असलेल्या चंद पाल या दिल्ली पोलिसांतील हेड कॉन्स्टेबलने गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) सकाळी सेवेवर रुजू झाल्यानंतर पाल यांनी स्वतःजवळील सर्व्हिस रायफलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा विभागात ते कार्यरत होते. गेट जी वर ते कार्यरत होते.

पाल यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. पोलिस याचा शोध घेत आहेत. आज सकाळी सात वाजता ते कामावर आले होते. त्यांच्याकडे त्या गेटवरील सुरक्षारक्षकांच्या टीमची जबाबदारी होती.