राफेलला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 10 रोजी सुनावणी

राफेलला स्थगिती देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर 10 रोजी सुनावणी

नवी दिल्ली : राफेल विमान खरेदीसंदर्भात भारत आणि फ्रान्स यांच्यातील कराराविरोधात दाखल जनहित याचिकेवर आता 10 ऑक्‍टोबरला सुनावणी होणार आहे. राफेल विमानासाठी 23 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या करारावर स्थगिती आणण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. 

न्यायाधीश रंजन गोगई, न्यायाधीश नवीन सिन्हा, न्यायाधीश के. एम. जोसेफ यांच्या पीठाने 10 ऑक्‍टोबरपर्यंत सुनावणी स्थगित केली. याचिकाकर्ते वकील मनोहरलाल शर्मा यांनी न्यायालयात कागदपत्रे जमा करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला. त्यानुसार ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. शर्मा यांनी राफेल विमानाच्या करारात अनियमितता असल्याचा आरोप करत तो रद्द करावा, अशी याचिकेत मागणी केली आहे. याचिकेत गुन्हा दाखल करण्याची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, उद्योगपती अनिल अंबानी आणि फ्रान्समधील शस्त्रनिर्मिती करणारी डसाल्ट कंपनीवर खटला भरण्याची आणि पैसे वसूल करण्याची मागणी केली.

राफेल कराराची स्वतंत्ररित्या चौकशी करण्याची आणि त्याची किंमत उघड करण्याची मागणी करणारी याचिका कॉंग्रेसचे अन्य नेते तहसीन पुनावाला यांनी या वर्षी मार्चमध्ये न्यायालयात दाखल केली होती. राफेल कराराला केंद्रीय मंत्रिगटाची मान्यता का घेतली गेली नाही, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com