अंदमानात अडकले 800 पर्यटक

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

पोर्ट ब्लेअर - अंदमानात मुसळधार पाऊस सुरु झाला असून, पोर्ट ब्लेअरपासून 40 किलेमीटर अंतरावर असलेल्या हॅवलॉक बेटावर जवळजवळ 800 पर्यटक अडकले आहेत. पर्यटकांच्या सुटकेसाठी भारतीय नौदलाने देखील बचाव मोहिम सुरु केली असल्याची माहिती मिळाली आहे. हॅवलॉक बेटांना चक्रीवादळाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अंदमानच्या स्थानिक प्रशासनाने भारतीय नौदलाकडे मदत मागितल्यानंतर, नौदलाची चार जहाजे बचावकार्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.   
 
अडकलेल्या पर्यटकांना हॅवलॉक बेटावरुन पोर्ट ब्लेअर येथे आणण्यात येणार आहे. आंदमान आणि निकोबारच्या पर्यटन विभागाच्या अमित जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यंटकांची संपूर्ण काळजी घेण्यात येत असून, त्यांना आवश्यक गोष्टी पुरविल्या जाणार आहेत.