राजधानी दिल्लीला मुसळधार पावसाने झोडपले

वृत्तसंस्था
बुधवार, 31 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - आज (बुधवार) सकाळी सात वाजता दिल्लीमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अद्यापही पाऊस सुरूच आहे. पावसामुळे दिल्लीतील बहुतेक परिसर पाण्याखाली आला आहे. सकाळपासूनच आकाशात ढग दाटून आल्याने सगळीकडे अंधार पसरला आहे.

आज सकाळी हलकासा पाऊस सुरू झाला. त्यानंतर पाऊस वाढत गेला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा पाऊस असाच पुढे सुरू राहणार आहे. दिल्लीसह गाझियाबाद आणि नोएडा येथेही मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे राजधानीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केव्ही दिल्लीतील काही धार्मिक स्थळांना भेट देणार होते. मात्र पावसामुळे त्यांचे वेळापत्रकही कोलमडले असून त्यांचा आजचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

Web Title: heavy rains disturb routine in Delhi

टॅग्स