डिजिटल व्यवहारांसाठी हेल्पलाइन क्र. 1444

पीटीआय
गुरुवार, 5 जानेवारी 2017

या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे

 

नवी दिल्ली -  केंद्र सरकारच्या दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांनी एकत्रितपणे सर्व डिजिटल व्यवहारांसाठी 1444 ही निशुल्क हेल्पलाइन सुरू केली आहे.

या हेल्पलाइनवर नव्याने सुरू करण्यात आलेल्या भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) वॉलेटसह अन्य डिजिटल व्यवहारांच्या प्रश्‍नांवर उत्तरे मिळणार आहेत. ही हेल्पलाइन देशाच्या उत्तर, तसेच पूर्व भागातही इंग्रजी आणि हिंदीमध्ये आहे. लवकरच सर्व भारतीय भाषांमध्ये ती सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती दूरसंचारचे सचिव जे. एस. दीपक यांनी दिली. दूरसंचार मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नॅसकॉम यांनी एकत्रितपणे ही हेल्पलाइन सुरू केली आहे. सर्व दूरसंचार कंपन्या या हेल्पलाइनमध्ये सहभागी असल्याने सर्वच कंपन्यांच्या ग्राहकांना ही हेल्पलाइन उपलब्ध असेल.

देश

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यदिन देशभरात साजरा होत असतानाच १५ ऑगस्ट रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये धक्काबुक्की...

07.48 PM

बंगळूर : विरोधी पक्षांवर खोटे गुन्हे दाखल करीत लाचलुचपत प्रतिबंध विभागाचा (एसीबी...

07.36 PM

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका...

01.15 PM