गोव्यामध्ये 'हाय ऍलर्ट' जारी

वृत्तसंस्था
शनिवार, 7 एप्रिल 2018

दहशतवादी दाखल होण्याची शक्‍यता

पणजी: पाकिस्तानने सोडलेल्या भारतीय मच्छीमारांच्या बोटींद्वारे काही दहशतवादी भारतात प्रवेश करण्याची शक्‍यता गुप्तचर यंत्रणेने व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गोवा, मुंबई, तसेच गुजरातमधील समुद्र किनाऱ्यावर हाय ऍलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मंत्री जयेश साळगांवकर यांनी दिली.

सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या भारतीय मच्छीमारांच्या काही बोटी कराची येथून सोडण्यात आल्या असून, त्या परतीच्या मार्गावर आहेत. या बोटींद्वारे दहशतवादी भारतात दाखल होण्याची शक्‍यता आहे. येथील महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला करण्याची त्यांची योजना असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने दिली असल्याचे साळगांवकर यांनी सांगितले. या माहितीनुसार, आज पणजी पोर्ट, पर्यटन विभागाचे संचालक, मच्छीमार, वॉटर स्पोर्ट, कॅसिनो व क्रुझ चालकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसताच पोलिस, तसेच इतर सुरक्षा यंत्रणेशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: High Alert release in Goa