अपहृत भारतीय ज्युडिथ डिसूझाची सुटका

वृत्तसंस्था
शनिवार, 23 जुलै 2016

नवी दिल्ली -  अफगणिस्तानातून अपहरण करण्यात आलेल्या कोलकाता येथील ज्युडिथ डिसूझा या तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आल्याची माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. ज्युडिथ लवकरच मायदेशात परतेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

ज्युडिथच्या पालकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या सुटकेसाठी स्वतः लक्ष घालण्याची विनंती केली होती. ज्युडिथच्या सुटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. अतिशय धाडसी व उमदी असलेली ज्युडिथ अफगणिस्तानच्या लोकांच्या कल्याणासाठी काम करीत होती. अफगणिस्तानच्या विकासकामात हातभार लावण्याची इच्छा असलेल्या भारतीय लोकांची ती प्रतिनिधीत्व करीत होती. तिच्या अपहरणाने आम्हाला मुळापासून हादरा बसला आहे. आम्ही तिची आतुरतेने वाट पाहात आहोत. तिची सुटका होईल अशी आशा कुटुंबीयांना होती. अखेर ज्युडिथ पुन्हा भारतात सुखरुप परतणार आहे.

आगाखान फाउंडेशन या संस्थेमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ज्युडिथ डिसूझा (वय 40) हिचे 9 जूनला काबूलमधून भर दिवसा दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. 

Web Title: Hijacked rescued Indian jyuditha disuza