'सुरक्षिततेसाठी हिंदूंनी "टिळा', "बिंदी' घालावी'

वृत्तसंस्था
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - कान्स येथे भारतीय अभियंत्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंनी असे हल्ले टाळण्यासाठी टिळा लावावा, बिंदी घालावी असा सल्ला हिंदू संहाती या संघटनेचे अध्यक्ष तपन घोष यांनी दिला आहे.

कोलकाता (पश्‍चिम बंगाल) - कान्स येथे भारतीय अभियंत्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंनी असे हल्ले टाळण्यासाठी टिळा लावावा, बिंदी घालावी असा सल्ला हिंदू संहाती या संघटनेचे अध्यक्ष तपन घोष यांनी दिला आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना घोष म्हणाले, "मला टिळ्यामध्ये काहीही रस नाही. मात्र आज वंशभेदी मुस्लिमांमुळे वातावरण अस्थिर झाले आहे. एखाद्याला त्यातून वाचविण्यासाठी टिळा लावावा आणि बिंदी परिधान करावी. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो. मला हिंदूंनी सुरक्षित राहावे असे वाटते.' कन्सास येथे झालेल्या हल्ल्यात श्रीनिवास कुचिबोतला या भारतीय अभियंत्याला आपले प्राण गमवावा लागले. "गेट आऊट ऑफ माय कंट्री', असे म्हणत एका व्यक्तीने श्रीनिवाससह अन्य एका भारतीय तरुणावर हल्ला केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी श्रीनिवासच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

देश

नवी दिल्ली : दुकानाच्या दारात दारू प्यायला बसलेल्यांना हटकल्याने दारूड्यांनी केलेल्या चाकुहल्ल्यात नवी दिल्लीत एकाचा मृत्यू झाला...

02.27 PM

नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) प्रवेशाचा ठराव संयुक्त जनता दल (जेडीयू) पक्षाने आज (शनिवार) संमत केला. पक्षाच्या...

02.09 PM

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूर प्रकरणावरून आज (शनिवार) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर...

01.42 PM