पाकमधील हिंदूंना किंमत मोजावी लागते: पंडित

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याची किंमत मोजावी लागत असल्याबद्दल काश्‍मिरमधील कार्यकर्ते सुशील पंडित यांनी चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : पाकिस्तानमधील हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याची किंमत मोजावी लागत असल्याबद्दल काश्‍मिरमधील कार्यकर्ते सुशील पंडित यांनी चिंता व्यक्त केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, "पाकिस्तानमधील हिंदूंना अल्पसंख्यांक असल्याची किंमत द्यावी लागते. हा केवळ मानवी हक्कांचा प्रश्‍न नाही. तेथील हिंदूंना वंशहत्येला सामोरे जावे लागत आहे. जर या गतीने हिंदूंची संख्या कमी होत गेली, तर एक दिवस एकही जण उरणार नाही. हा इथे भारतात असणाऱ्यांसाठी इशारा आहे.' यावेळी पंडित यांनी केंद्र सरकार भारतात नसलेल्या हिंदूंसाठी काहीच प्रयत्न करण्यात येत नसल्याचे म्हणत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "केंद्र सरकार या हिंदूंची जबाबदारी घेत नसल्याची मला लाज वाटते.'

पाकिस्तानमध्ये कर्जाची रक्कम दिली नाही म्हणून मुलींना उचलून घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एका हिंदू कुटुंबाने कर्ज दिले नाही म्हणून मुलीला एक हजार डॉलरमध्ये एका व्यक्तीने विकत घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. या पार्श्‍वभूमीवर पंडित यांनी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.