हिसारमध्ये सुधारगृहातून अल्पवयीन गुन्हेगारांचे पलायन

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

हिसार: येथील सुधारगृहातून सहा अल्पवयीन गुन्हेगार पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

हिसार: येथील सुधारगृहातून सहा अल्पवयीन गुन्हेगार पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे, असे पोलिसांनी सांगितले. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

सुधारगृहातील कर्मचारी मुलांना पाणी देण्यासाठी गेला असताना त्याला तेथील दरवाजा उघडा दिसला. या अल्पवयीन गुन्हेगारांनी त्याला आत ओढले आणि बरॅकमध्ये कोंडून ठेवले, असे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर ते सुधारगृहाच्या मुख्य दरवाजापाशी गेले आणि त्यांनी सुरक्षा रक्षकावर गजाने हल्ला केला. त्यानंतर त्यांनी मुख्य दरवाजाच्या चाव्या त्याच्याकडून हिसकावून घेतल्या. सुधारगृहातील अन्य कर्मचाऱ्यांनी अलार्म वाजवीत पोलिसांना याची माहिती दिली. सुधारगृहात जी मुले बंद होती त्यांच्यावर हत्येसह विविध गुन्हे दाखल आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पलायन केलेल्या मुलांचा शोध घेण्यात येत आहे.

टॅग्स