दंतेवाडामध्ये माजी सरपंचाची नक्षलवाद्यांकडून हत्या

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 जून 2017

दंतेवाडा जिल्ह्यातील चोलनर गावाचे माजी सरपंच छन्नूराम मंडवी (वय 55) यांची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. मंडवी यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारण्यात आले आहे.

दंतेवाडा - छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात माजी सरपंचाची नक्षलवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दंतेवाडा जिल्ह्यातील चोलनर गावाचे माजी सरपंच छन्नूराम मंडवी (वय 55) यांची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. मंडवी यांच्या घरात घुसून त्यांना ठार मारण्यात आले आहे. मंडवी झोपेत असताना शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांची हत्या केली. 
मंडवी यांच्या हत्येची माहिती मिळाल्यानंतर तत्काळ पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. घटनास्थळाहून नक्षलवाद्यांची पत्रके हस्तगत करण्यात आली आहेत. नकुलनार येथील काँग्रेस नेते अवधेश गौतम यांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी मंडवी यांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता त्यांची पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली आहे.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
घोषणांच्या पावसात शेतकरी कोरडाच
पालखी सोहळ्यात वारकरी विरुद्ध धारकरी : नक्की प्रकार काय?
मस्ती असेल तर 'मुदतपूर्व' घ्याच : उद्धव ठाकरे
#स्पर्धापरीक्षा - GST​
दिल्लीत महिलेवर गाडीत सामूहिक बलात्कार करून फेकून दिले​
कोहलीला खरंच नकोयं कुंबळे प्रशिक्षक​
मुंबईत भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या​
गरोदर लेकीला मारणाऱ्या नराधम बापाला अखेर फाशी