हनीप्रीत प्रकरणी "दाल में कुछ काला तो हैं' !

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

हनीप्रीतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य कळेल. मात्र पंजाब पोलिस दलाने यासंदर्भातील माहिती हरयानाच्या पोलिस दलासही कळवावयास हवी होती. पंजाब पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटते

चंडीगड - बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेला बाबा रामरहिम याची दत्तक मुलगी असलेल्या हनीप्रीत इन्सान ही सुमारे 40 दिवस फरार असल्यासंदर्भात बोलताना हरयानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आज (शुकवार) पंजाब पोलिस दलास लक्ष्य करताना "दाल में कुछ काला तो हैं,' अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

"या प्रकरणी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी हरयाना राज्याचे पोलिस पथक पंजाबमध्ये गेले आहे. हनीप्रीतची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सत्य कळेल. मात्र पंजाब पोलिस दलाने यासंदर्भातील माहिती हरयानाच्या पोलिस दलासही कळवावयास हवी होती. पंजाब पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद वाटते,'' असे खट्टर म्हणाले.

दरम्यान, खट्टर यांच्या या विधानावर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. खट्टर त्यांच्या सरकारचे अपयश झाकण्याकरिताच अशा प्रकारचे वृथा आरोप करत असल्याची टीका सिंग यांनी केली आहे.