हनीप्रीत इन्सानला सहा दिवसांची पोलिस कोठडी

वृत्तसंस्था
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

बाबा राम रहिम याला शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर हरयाना व पंजाब या राज्यांतील काही भागांत गेल्या 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर तिच्यावर व "डेरा सच्चा सौदा'च्या अन्य काही वरिष्ठ सदस्यांवर हिंसाचारास चिथावणी दिल्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आला होता

नवी दिल्ली - बलात्कार प्रकरणी शिक्षा सुनाविण्यात आलेला "डेरा सच्चा सौदा'चा बाबा राम रहिम सिंग याची दत्तक मुलगी हनीप्रीत इन्सान उर्फ प्रियांका तनेजा हिला न्यायालयाने आज (बुधवार) सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

बाबा राम रहिम याला शिक्षा सुनाविण्यात आल्यानंतर हरयाना व पंजाब या राज्यांतील काही भागांत गेल्या 25 ऑगस्ट रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर हनीप्रीत फरार झाली होती. यानंतर तिच्यावर व "डेरा सच्चा सौदा'च्या अन्य काही वरिष्ठ सदस्यांवर हिंसाचारास चिथावणी दिल्यासंदर्भातील आरोप निश्‍चित करण्यात आला होता.

हनीप्रीतसोबत असणाऱ्या अन्य एका महिलेसही अटक करण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने हनीप्रीतचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर तिची अटक निश्‍चित मानली जात होती. तिच्या अटकेसाठी पोलिसांनी लुकआउट नोटीसही बजावली होती. नेपाळमध्येही तिचा शोध घेतला जात होता.