तुला चांगला पती मिळेल; व्हॉट्सऍपवरून 'ट्रिपल तलाक'

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

हैदराबादः माझ्यापेक्षा तुला चांगला पती मिळेल. तलाक, तलाक, तलाक... असा व्हि़डिओ तयार करून व्हॉट्सऍपवरून ट्रिपल तलाक पाठविणाऱया पतीविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या युवकाने ट्रिपल तलाकचा व्हिडिओ तयार करून व्हॉट्सऍपवरून पत्नीला पाठविला. दोन वर्षांपुर्वीच त्यांचा विवाह झाला आहे. याविरोधात महिलेने तक्रार दाखल केली आहे.

व्हॉट्सऍपवरून ट्रिपल तलाकचा व्हिडिओ आल्यानंतर महिला पतीच्या घरी गेली. परंतु, तिला घरात प्रवेश करू दिला नाही. सासू-सासऱयांनी सांगितले की, 'आमच्या मुलाने तुला तलाक दिला आहे. विवाह एक अपघात होता. आम्ही प्रार्थना करतो की, तुला चांगला पती मिळेल.'

'व्हॉट्सऍपवरून तलाकचा व्हिडिओ आल्यानंतर लगेच दुसऱया दिवशी तलाकनामाचे पेपर व कायदेशीर नोटीस घरी आली. यामुळे मला मोठा मानसिक धक्का बसला आहे,' असे महिलेने म्हटले आहे.